ग्राहकांचा हक्क
ग्राहकाचा हक्क आहे दुकानात येऊन वेगवेगळे प्रोडक्ट पाहणे आणि काहीच खरेदी न करता निघून जाणे हा ग्राहकाचा हक्क आहे. बार्गेनिंग करणे हा ग्राहकाचा हक्क आहे. व्यवहार करताना पैसा वाचवण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा हक्क आहे. प्रोडक्टमधे चूक आढळल्यास, खराब सर्व्हिस मिळाल्यास आपल्यावर चिडणे, रागावणे हा ग्राहकाचा हक्क आहे. अगदी ग्राहक म्हणून थोड्याश्या गुर्मीत बोलणे हासुद्धा ग्राहकाचा हक्क आहे. व्यवहार ठरलेल्या वेळेत, आणि ठरलेल्या पैशातच पूर्ण करून मिळणे हा ग्राहकाचा हक्क आहे. हव्या त्या व्यावसायिकाकडे खरेदी करणे हा ग्राहकाचा हक्क आहे. त्याने आपल्याकडेच कायमस्वरूपी खरेदी करावी असा अट्टाहास कामाचा नाही. प्रोडक्ट सांगितल्याप्रमाणेच, निश्चित केलेल्या गुणवत्तेचेच मिळणे हा ग्राहकाचा हक्क आहे. व्यावसायिकाकडून सन्मानाची वागणूक मिळणे हा ग्राहकाचा हक्क आहे. - ग्राहकाचे हक्क मान्य असतील तरच व्यवसाय करता येऊ शकतो. - व्यावसायिक म्हणून आपल्याला मनासारखा पैसा कमवण्याचा हक्क आहे, उधारी वेळेवर मिळणे, ग्राहकाकडून निश्चित केलेल्या ताराखेमध्ये ...