International Women's Day
भारतीय परंपंरेत आदीशक्ती म्हणून नेहमीच स्त्री शक्तीचा गौरव केला जातो. असे म्हटले जाते की शेतीचा शोध स्त्रीने लावला. एका जननक्षम स्त्रीने धरतीच्या पोटातून धान्य कसे उगवायचे हे सांगितले. गमंत म्हणजे आज सात बाराच्या उताऱ्यावर तिला आपल्या नावाची मोहर सहजासहजी उमटवता येत नाही. तिचा सातबारा कोराच राहतो. पौराणिक ग्रंथात असो की आधुनिक संविधानात…तिला स्थान तर दिले आहे पण वास्तवात तिचे शरीर हीच तिची ओळख कायम राहिल याची अलिखित तरतूदही केली आहे. तिच्या शरीराच्या आत आत्माही असतो तिकडे मात्र कानाडोळा करण्याचे पुरूषी कसब आपल्या संस्कृती नावाच्या व्यवस्थेने केले आहे. तिच्या विचारांवर अदृष्य लगामही लावण्यात पुरूषी सत्तेला यश आले आहे. सौंदर्यवान स्त्रीयानां विषकन्या बनविण्याच्या प्रयोगशाळेचे सूत्रधार पुरूषच….तिच्या देहाचा असा वापर करतानां प्रतिष्ठेचा मुखवटा फाटू नये म्हणून स्वत:ला जपणारा धुरंदर देखिल पुरूषच………… गुलामीतही स्वातंत्र्य कसे जपता येते हे हिकमतीने सांगणारा धूर्त ही पुरूषच…….कधी कधी स्त्री मर्दानी असते असं सांगून फसव्या जाळ्यात ओढणारा पुरूषच…… निसर्गत:च स्त्री दुबळी आहे सांगत स्वत:चं षंढप...